पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग साईट शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. डेटिंगची सेवा न देता वेळोवेळी विविध कारणांसाठी तब्बल ६५ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मे आणि सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान घडली. जयंत विश्वनाथ ढाळे (वय ४०) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा -हैदराबादमधील पीडितेला न्याय मिळाला, कोल्हापुरातील तरुणींकडून पोलिसांचे अभिनंदन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत हे इंटरनेटवर डेटिंगसाठी सर्च करत होते. त्यावेळी त्यांना 9733901295 हा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर जयंत यांनी फोन केला. फोनवरील व्यक्तीने जयंत यांना प्रथम रजिस्ट्रेशन करायला सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सर्व्हिस मिळेल, असे जयंत यांना सांगण्यात आले. त्यानुसार रजिस्ट्रेशन करताना जयंत यांनी बँकेच्या खात्यावर काही रुपये भरले.