Exam Fever 2022 : पुणे:यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थिती नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
Exam Fever 2022 : १२ वीचा निकाल १०, तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता
Exam Fever 2022: इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा (The result of 12th will be on 10th) तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर (the result of 10th will be by 20th June) केला जाईल, अशी शक्यता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Board of Secondary and Higher Secondary Education) व्यक्त करण्यात आली आहे.
शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परीक्षेतील शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची प्रथा आहे. पण यावेळी इयत्ता बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिरा सुरू झाली. त्यामुळे बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, अशी शक्यता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Board of Secondary and Higher Secondary Education) व्यक्त करण्यात आली आहे. तसेच बारावीचा निकालाच्या १० दिवसांनंतर दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केली आहे.