पुणे: शनिवारी रात्रीपासून टेमघर धरण क्षेत्रात ७८ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ६३ मि.मी, पानशेत धरण परिसरात ६४ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात दहा मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १७.६७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी रात्री चारही धरणांत १७.१७ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी रात्रीच्या तुलनेत रविवारी सकाळी तब्बल ०.५० टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
The rain subsided: खडकवासला धरणातून २९९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी - 2996 cusecs water release
धरण क्षेत्रातील पाऊस (The rain subsided) कमी झाला आहे. खडकवासला धरणातून ( Khadakwasla dam) मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग २९९६ क्युसेकपर्यंत कमी ( 2996 cusecs water release ) करण्यात आला आहे. चारही धरणांमधील पाणीसाठा १७.६७ अब्ज घनफूट (टीएमसी) ६०.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
खडकवासला धरण
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहिती नुसार बुधवारपासून खडकवासला धरण परिसरात तुलनेने पाऊस कमी झाला आहे. शनिवारी या धरणातून मुठा नदीत ४७०८ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सध्या या धरणातून २९९६ क्युसेक वेगाने मुठा नदीत, तर १००५ क्युसेकने नवीन मुठा कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा | टीएमसी | टक्क्यांत |
टेमघर | १.७३ | ४६.६२ |
वरसगाव | ७.३४ | ५७.२८ |
पानशेत | ६.६२ | ६२.२२ |
खडकवासला | १.९७ | १००.०० |
एकूण | १७.६७ | ६०.६ |