पुणे- मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने चांगलीच मुसंडी मारली आहे. हीच स्थिती पुढील चार दिवस कायम राहणार असून आज (दि. 5 जुलै) आणि उद्या (दि. 6 जुलै) मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय येत्या चार दिवसात कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. घाट माथ्यावर, पिकनिक स्पॉटवर धबधब्यांचा पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि दरडी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
माहिती देताना वेधशाळा प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी आगामी चार ते पाच दिवस कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात रविवार आणि सोमवारी (दि. 6 जुलै) या दोन दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात रविवारी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात 6 जुलैपासून 9 जुलैपर्यंत पाऊस कमी होत जाईल. मात्र, या कालावधीत दोन्ही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. कोकणासह पुण्यातील काही घाटमाथ्यावर दाट धुके पडण्याची शक्यता आहे. याशिवाय घाटमाथा परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात येत्या 24 तासात मध्यम स्वरुपाचा पाऊस
शनिवारपासून पुण्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. तर येणाऱ्या 24 तासात पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार पडेल. त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
हेही वाचा -Corona: पुण्यात पुन्हा एकदा नाकाबंदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार पुणेकरांवर पोलिसांची कारवाई