पुणे - सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी आग लागली आहे या आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, खरच असे झाले का? याचा तपास केला जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार - विजय पाटकर
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी भेट दिलेल्या सिरम कंपनीतील इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती. आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. कंपनीकडूनही चौकशी करण्यात येत आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला परदेशात असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असे सांगितले.