महाराष्ट्र

maharashtra

भामा-आसखेड धरणातून पुण्याला जाणारी पाइपलाइन फुटली; आळंदीत लाखो लिटरची नासाडी

By

Published : Dec 16, 2020, 4:33 PM IST

भामा आसखेड धरणातून पुण्याला जाणाऱ्या पाइपलाइचे काम सुरू आहे. या ठिकाणी चाचणी सुरू असतानाच आळंदी येथे इंद्रायणी नदीलगत वॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाया गेले आहे.

drinking water pipelines in pune
भामा-आसखेड धरणातून पुण्याला जाणारी पाइपलाइन फुटली; आळंदीत लाखो लिटरची नासाडी

पुणे - भामा आसखेड धरणातून पुण्याला जाणाऱ्या पाइपलाइचे काम सुरू आहे. या ठिकाणी चाचणी सुरू असतानाच आळंदी येथे इंद्रायणी नदीलगत वॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाया गेले आहे.

भामा-आसखेड धरणातून पुण्याला जाणारी पाइपलाइन फुटली; आळंदीत लाखो लिटरची नासाडी

भामा आसखेड धरणातून पुण्याच्या पूर्व भागात पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. मागील पंधरा दिवसांपासून या ठिकाणी पाण्याची चाचणी सुरू आहे. आज दुपारी पाइपलाइनद्वारे उच्च दाबाने पाणीपुरवठा सुरू असताना आळंदीजवळ प्रेशर वॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हा प्रकार समोर आल्यानंतर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसले. बराच वेळ मोठ्या प्रमाणात कारंजे उडत होते.

भामा आसखेड धरणातून पुण्यासाठी दररोज 200 एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या चाचणी सुरू आहे. या दरम्यान आज आळंदीत पाण्याची लाइन फुटल्याने या प्रकल्पाचे पाणी पुण्याला जाण्यास अद्याप विलंब लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details