महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीत दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगाराला कर्जतमधून अटक; 7 दुचाकी जप्त - पिंपरी-चिंचवड गुन्हे बातमी

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 2 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या एकूण सात दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपी व जप्त दुचाक्यांसह पोलीस पथक
आरोपी व जप्त दुचाक्यांसह पोलीस पथक

By

Published : Nov 4, 2020, 7:54 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) -एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 2 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या एकूण सात दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.

जीवन नाना गिरगुणे (वय 23 वर्षे, रा. मिरजगाव, जि. अहमदनगर), असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तीन, दिघी आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरातून एक दुचाकी चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, अहमदनगर जिल्ह्यातील सराईत चोरटा जीवन याने हा गुन्हा केला आहे. त्यानुसार त्याला कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या एकूण सात दुचाक्या जप्त केल्या आहेत.

हेही वाचा -पिंपरीत टवाळखोरांची पोलिसांना दमदाटी करून शिवीगाळ; दोघांना अटक

हेही वाचा -डेक्कन परिसरात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 12 जणांवर गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details