महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रात्रभर बरसलेल्या पावसाने द्राक्षांसह पालेभाज्या व कांद्याची मोठी नासाडी - pune rain news

शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याने तो पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. नुकसानीला कवडीमोल मदतीने शेतकरी उभा राहणार नसून आता तरी भरीव मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.

rains
rains

By

Published : Jan 9, 2021, 5:54 PM IST

Updated : Jan 9, 2021, 6:03 PM IST

जुन्नर -पुणे मागील दोन दिवसांपासून जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह ढगफुटीजन्य आवकाळी पावसाने फळबागा, तरकारी माल, भाजीपाला, जनावरांची खाद्य पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याने तो पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. नुकसानीला कवडीमोल मदतीने शेतकरी उभा राहणार नसून आता तरी भरीव मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.

rains

फळबागांसह शेतमालाचे नुकसान

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शेतमाल शेतातच फेकून देण्याची वेळ आली होती. नंतरच्या काळात चक्रीवादळात उभी पिके गेली, तर आवकाळी पावसात खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. यातूनही उभारी घेत शेतकऱ्यांनी द्राक्ष, पेरू, डाळिंब, केळीच्या बागा उभारल्या. तर काही भागात कांदा, बटाटा, पालेभाज्या, गहू, हरभरा, शाळू यासह इतर पिकांचेसुद्धा अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाल आहे. त्यामुळे शेतकरी यंदाच्या वर्षात नुकसानीत गेला आहे.

rains

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धो-धो बरसत होता. यामुळे नारायणगाव, गुंजाळवाडी, हिवरेतर्फे नारायणगाव, लेण्याद्री या परिसरातील हजारो एकरवरील द्राक्ष पीक धोक्यात आली आहे. द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले असून डावणी, फळकूज वाढणार आहे. द्राक्ष बागेमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान होणार आहे. तोडणी हंगाम बहरात आला असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक फळबागा आहेत. यामध्ये द्राक्ष, डाळिंबाचे जास्त उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाने द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अजूनही अनेक फळबागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पुढील काळात फळबागांचे नुकसान होऊन रोगराई पसरणार आहे.

चारा भुईसपाट

हिवाळ्यात शेतकरी जनावरांना लागणारा चारा साठवणुकीसाठी तयार करत असतो. आता हा चारा काढणीला आला असताना वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटीजन्य आवकाळी पावसाने उभा चारा भुईसपाट झाला आहे. त्यामुळे पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याची चिंता शेतकऱ्यांपुढे उभी आहे.

Last Updated : Jan 9, 2021, 6:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details