पुणे - पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार १६५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. शहरात दुसरी लाट आल्यापासून दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुगणसंख्या ही सर्वात कमी आहे. त्यामुळे, ही मोठी दिलासा देणारी बाब आहे. एकीकडे नव्या रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आलेली असताना दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, आज दिवसभरात ४ हजार १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे समाधानकारक चित्र आहे.
दिलासादायक..! पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या घटली, ४०१० रुग्णांना डिस्चार्ज - Corona Patient Discharge Number Pune
पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार १६५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. शहरात दुसरी लाट आल्यापासून दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुगणसंख्या ही सर्वात कमी आहे. त्यामुळे, ही मोठी दिलासा देणारी बाब आहे.
दरम्यान, आज पुण्यात ७४ कोरोनाबाधित मृत्यू झाला असून यातले २३ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, तर शहरात सध्या १ हजार ४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ४ लाख ४७ हजार ७२९ झाली आहे, तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ३० हजार ८३६ इतकी आहे. आजपर्यंत एकूण मृत्यू ७ हजार ४०९ झाले आहेत आणि आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४ लाख ९ हजार ४८४ आहेत. तसेच, आज ११ हजार ४९९ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
हेही वाचा -उजनीचे पाणी देण्यावरून जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ