बारामती- मोरगाव ते नीरा नरसिंगपूरकडे जाणाऱ्या महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. मात्र, आता राज्य शासनाने हायब्रिड अँन्युटीप्रकल्पातर्गत या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच मोरगाव-निरा नरसिंगपूर हा प्रवास जलद व सुखकर होणार आहे.
दर्शनासाठी असंख्य भाविकांची गर्दी-
राज्यभरातील असंख्य भाविक बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मयूरेश्वराचे दर्शन घेऊन इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंगपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंहच्या दर्शनासाठी जातात. मात्र मागील काही दिवसांपासून मोरगाव ते नीरा नरसिंगपूर कडे जाणाऱ्या या महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यातच या महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला भाविकांना सामोरे जावे लागत होते.
मोरगाव ते निरा नरसिंगपूर हे ८६ किमी अंतर..
मोरगाव ते निरा नरसिंगपूर हा ८६ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. मोरगाव-बारामती-कळंब-बावडा-नीरा नरसिंगपूर हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने मुळातच अरुंद होता. त्यातच ठिकाणी ठिकाणी रस्त्यावर खड्डे, अतिक्रमणे आणि अवजड वाहनांच्या पार्कींगमुळे या महामार्गावर आजपर्यंत अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महामार्गसाठी २०४ कोटी ७७ लाख रुपये खर्चास मान्यता....