महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत सावकाराने शेतकऱ्याची तीन कोटींची जमीन केली परत - Baramati farmer news

बारामतीमध्ये शेतकऱ्याला नाडणाऱ्या सावकाराला चाप लावण्यात आला. या सावकाराला शेतकऱ्याची सुमारे ३ कोटी रुपयांची जमीन परत करावी लागली. शेतकऱ्याने पोलिसांचे आभार मानले.

बारामतीत सावकाराने शेतकऱ्याची तीन कोटींची जमीन केली परत
बारामतीत सावकाराने शेतकऱ्याची तीन कोटींची जमीन केली परत

By

Published : Dec 19, 2020, 7:25 AM IST

बारामती - बारामतीतील एका गरीब शेतकऱ्याने शहरातील एका सावकाराकडे तीन कोटी रुपयांची जमीन गहाण ठेवली होती. त्याने १० टक्के दराने १० लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याची दीडपट रक्कम देऊन ही आणखी पाच लाखाची मागणी करणाऱ्या सावकाराला पोलिसांनी चांगलेच वठणीवर आणले.

सावकाराकडून शेतकऱ्याची सुरू होती लूट

बारामती शहरातील जळोची येथील सावकाराने २०१७ साली बारामतीतील नागवडे वस्तीतील एका शेतकऱ्याला १० लाख रुपये व्याजाने दिले होते. संबंधित शेतकर्‍याने महिना १ लाख असे १८ महिने पैसे देऊनही आणखी ५ लाखाची मागणी करत होता. एवढेच नव्हे तर या सावकाराने संबंधित शेतकऱ्याचा बारामती बाजार समितीत असणारा गाळा नावावर करून दे म्हणून मागे लागला होता. तसेच पैसे नाही दिले तर तुझ्या जमिनीवर आरक्षण टाकायला लावीन अशा धमक्या देत होता. हा प्रकार संबंधित शेतकऱ्याने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांना सांगून मदतीची मागणी केली.
शेतकऱ्यांने पोलिसांचे मानले आभार
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. सावकाराला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. संबंधित सावकाराने आपण किती मोठी व्यक्ती असल्याचा आव आणला. शिंदे यांनी मात्र याला कोणत्याही प्रकारची भीक न घालता सावकारावर कारवाईची तयारी सुरू केली. कारवाई होणार हे समजताच सावकार नरमला आणि संबंधित शेतकऱ्याला त्याची जमीन परत देण्याची तयारी दाखवली व जमीन पुन्हा उलटून दिली. संबंधित शेतकऱ्याची दीड एकर जमीन आजच्या बाजारभावाप्रमाणे तीन कोटी रुपयांच्या घरात आहे. जमीन परत मिळाल्याने शेतकऱ्याने पोलिसांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details