औरंगाबाद/नागपूर/पुणे -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प ( union budget 2022 ) सादर केला. अर्थसंकल्पानंतर विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया येत असून काहींनी अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केले तर काहींनी टीका ( reaction on union budget 2022 ) केली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात उद्योग उभारणीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन उद्योजकांना फायदा होईल. विशेषतः 200 नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. त्याची बांधणी भारतात होणार असल्याने त्याचा फायदा उद्योगांना होणार आहे. तर नवीन यंत्रणा उभारणीसाठी करण्यात आलेली तरतूद, तसेच 5 जी यंत्रणा यामुळे उद्योगांना चालना मिळेल, असे मत सीएमआयएचे कोषाध्यक्ष प्रीतिष चॅटर्जी यांनी व्यक्त केलं.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया तसेच गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेली मरगळ दुर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केला असल्याची प्रतिक्रिया नागपूरमधील चार्टर्ड अकाऊंटंट नरेश जखोटिया यांनी दिली आहे. एकंदरीत आजचा बजेट ग्रोथ ओरिएंटेड आणि बॅलन्स असल्याचं देखील त्यांनी नमूद केले आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया गेल्या 2 ते 3 वर्षात देशात प्रत्येक घरात आजारपण पार्ट ऑफ लाईफ झाला आहे. आशा वेळेला पगारदार व्यक्तीला काही सवलत मिळेल का ही अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कोणतही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सामान्य कर दात्याच्या दृष्टीने फारसा दिलासा देणारं अर्थसंकल्प नाही, असं मत पुणे येथून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टट अकाउंट ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष सीए डॉ दिलीप सातभाई यांनी व्यक्त केलं आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया हेही वाचा -Union Budget 2022 : छगन भुजबळ आणि यशोमती ठाकूर यांची अर्थसंकल्पावर टीका, म्हणाले...