बारामती -काटेवाडी येथील शेतकऱ्याची 3 व्यापार्यांकडून सव्वा पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शेतकरी रणजीत दळवी यांनी तालुका पोलीस ठाण्यात संबधीत व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
बारामतीमधील एका शेतकऱ्याची व्यापार्यांकडून सव्वा पाच लाखांची फसवणूक - merchant cheated a farmer in Baramati
काटेवाडी येथील शेतकऱ्याची तीन व्यापार्यांकडून सव्वा पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
![बारामतीमधील एका शेतकऱ्याची व्यापार्यांकडून सव्वा पाच लाखांची फसवणूक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5078722-thumbnail-3x2-jk.jpg)
२ सप्टेंबर २०१९ रोजी रणजीत दळवी यांनी आपल्या शेतातील 12 टन डाळिंब ४८ रुपये किलो दराने अण्णासाहेब खोपडे, राहुल काळे ( रा. सणसर ता. इंदापूर ), अस्लम शेख (रा. कल्याण. सदानंद चौक, मुंबई ) या व्यापाऱ्यांना विकत दिले होते.
मालाची एकूण ५ लाख ७६ हजार इतकी रक्कम झाली. ठरलेल्या व्यवहारानुसार व्यापाऱ्यानी ५० हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. मात्र बाकीचे ५ लाख २६ हजार वेळेवेळी मागणी करुनही देत नसल्याचे रणजीत यांनी सांगितले आहे. संबधीत व्यापाऱ्याविरोधात आर्थिक फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार ओमासे करीत आहे.