पुणे- थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात टाटा अल्ट्रा संस्थेकडून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 1400 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारत देशाचे नाव जगाच्या पातळीवर नाव लौकीक करण्यासाठी आणि उत्कृष्ट तसेच दर्जेदार स्पर्धक घडवण्यासाठी या जागतिक दर्जाच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
लोणावळ्यात जागतिक दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा संपन्न - अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया
टाटा अल्ट्रा संस्थेकडून लोणावळ्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या मॅरेथॉन स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एएफआयच्या (अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया) सर्व नियम व अटी नुसार ही स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण 18 ते 45 या वयोगटातील 1400 हून अधिक स्पर्धकांनी या ऑनलाईन पद्धतीने आपला सहभाग नोंदवला. मध्यरात्री अडीच वाजता या स्पर्धेला सुरुवात लोणावळा शहरातून झाली होती. 50 किलोमीटर आणि 35 किलोमीटर अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे विभाजन करण्यात आले होते. उत्तुंग प्रतिसाद लाभलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप पवना नगर येथील तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी झाला.
हेही वाचा -'ते' कथित बांगलादेशी राज ठाकरेंवर खटला दाखल करणार