पुणे - अष्टविनायकातील आठव्या क्रमांकाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱया पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या महागणपतीच्या मुखद्वार दर्शन यात्रेला शनिवारपासुन सुरवात झाली आहे. ही यात्रा पुढील सात दिवस सुरू राहणार आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये भाविकांना महागणपतीच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेता येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी रांजणगाव या ठिकाणी येत आहेत.
अष्टविनायक रांजणगाव महागणपतीची मुखद्वार यात्रा सुरू - गणेशोत्सव 2019
अष्टविनायकातील आठव्या क्रमांकाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या महागणपतीच्या मुखद्वार दर्शन यात्रेला शनिवारपासुन सुरवात झाली आहे. ही यात्रा पुढील सात दिवस सुरू राहणार आहे.
या चार दिवसांमध्ये महागणपतीची पालखी रांजणगाव येथून निघते आणि गणपतीच्या बहिनी असलेल्या कर्डे, निमगाव,गणेगाव, डोक सांगवी या चार गावांमध्ये जाते. गणेश उत्सव काळात आसपासच्या पंचक्रोशीत कुठेही गणपती बसवला जात नाही. एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून महागणपतीचीच सेवा केली जाते. देवस्थान ट्रस्टने यावर्षी मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषनाईने सजवले आहे. पालखी मार्गापुढे संपूर्ण गावात रांगोळीदेखील काढण्यात आली आहे.
रांजणगावचा महागणपती नवसाला पावणारा असल्याचे बोलोले जाते. यात्रा काळात दहा लाखांपेक्षा जास्त भाविक महागणपतीचे दर्शन घेतात. देवस्थान ट्रस्ट भाविकांसाठी सर्व सुविधा पुरवत आहे. त्याचबरोबर, पोलिसांकडूनही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.