महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीच्या वादातून नातवाने केली आजोबांची हत्या, पुणे जिल्ह्यातील घटना - Incidents in Shirur taluka news

जमिनीच्या बांधाच्या वादातून नातवाने आजोबांची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील केंदूर येथील ताथवडे वस्ती येथे घडली आहे.

तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर पोलीस स्टेशन
तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर पोलीस स्टेशन

By

Published : Jul 7, 2021, 7:13 PM IST

पुणे - शेतीच्या वादातून नातवाने आजोबांची हत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील केंदूर येथील ताथवडे वस्ती येथे घडली आहे. जमिनीच्या बांधाचा वाद चालू होता. त्या वादातून ६९ वर्षीय वृद्धाची नातवाने दगडाने ठेचून हत्या केली. बबलू सुदाम चौधरी (रा. केंदूर, ता. शिरुर, जि. पुणे) असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर, शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय ६९, रा. केंदूर, ता. शिरुर, जि. पुणे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, बबलू चौधरीच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठार मारण्याची दिली होती धमकी

जमिनी बाजूबाजूला असताना अनेक वेळा वाद झाले होते. मात्र, एके दिवशी भरतने शंकरराव यांना 'शेताला काट्या लावता काय, मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुम्हाला ठार मारणार आहे' असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर, दमदाटी करून शंकरराव यांच्या डोक्यात, चेहर्‍यावर, मांडीवर, दगडाने लाकडी चौरंग, टेबल, फॅनने मारहाण केली. त्यामध्ये शंकरराव यांचा मृत्यू झाला. दरम्यान, निर्मला ताथवडे (वय -55 रा. ताथवडे वस्ती केंदुर ता. शिरूर जी- पुणे) या भांडणे सोडवण्यास आल्या असता त्यांनाही संदीपने मारहाण केली. या प्रकारानंतर शिक्रापूर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संदीप या घटनेनंतर फरार झाला असून, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details