महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'विराज'च्या हत्येप्रकरणी संबंधित मुलीलाही आरोपी करावं; केंद्रीय मंत्र्यांची मागणी..

या प्रकरणातील मुलीने फोनद्वारे मृत तरुणाला घटनास्थळी बोलावले होते, मात्र त्या ठिकाणी ती नव्हती. तसेच, आपला आणि विराजची ओळखही नव्हती असे त्या मुलीने म्हटले आहे. याबाबतची चौकशी पोलिसांनी करावी, आणि संबंधित मुलीलाही आरोपी करावे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

The girl involved in Viraj Jagtap Murder should also be booked says Union minister Ramdas Athavle
विराज'च्या हत्येप्रकरणी संबंधित मुलीलाही आरोपी करावं; केंद्रीय मंत्र्यांची मागणी..

By

Published : Jun 14, 2020, 4:48 AM IST

Updated : Jun 14, 2020, 5:00 AM IST

पुणे - गेल्या आठवड्यात पिंपळे सौदागर येथे प्रेम प्रकरणातून विराज विलास जगताप या वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सहा आरोपी अटकेत आहेत. मात्र, या प्रकरणातील मुलीलादेखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, की पिंपळे सौदागर येथे बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली, ही घटना गंभीर आहे. मराठा आणि दलित हे दोन समाज एकत्र आले पाहिजेत अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही हे स्वप्न होते. जातीच्या नावावर आपल्या मनात असलेली कटुता संपुष्टात आणली पाहिजे, आणि समाज एक झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी मांडली असल्याचे आठवले म्हटले.

विराज'च्या हत्येप्रकरणी संबंधित मुलीलाही आरोपी करावं; केंद्रीय मंत्र्यांची मागणी..

या तरुणाची हत्या ही निंदनीय घटना असून, या घटनेतून जातीयवादी मानसिकता समोर आलेली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुलाच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणातील मुलीने फोनद्वारे मृत तरुणाला घटनास्थळी बोलावले होते, मात्र त्या ठिकाणी ती नव्हती. तसेच, आपला आणि विराजची ओळखही नव्हती असे त्या मुलीने म्हटले आहे. याबाबतची चौकशी पोलिसांनी करावी, आणि संबंधित मुलीलाही आरोपी करावे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

हेही वाचा :'मुख्यमंत्री कोरोनाचा सामना करू शकले नाहीत; सरकारच्या बेशिस्तपणानेच रुग्णसंख्या वाढली..'

Last Updated : Jun 14, 2020, 5:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details