पुणे - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी निसर्ग चक्रीवादळात रुपांतर झाले. आज दुपारी हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकले. या वादळाचा तडाखा मुंबई, रायगड, ठाणे या ठिकाणी बसला आहे. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम हा पुणे जिल्ह्यावर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातही जाणवेल निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव; हवामान तज्ज्ञांची माहिती - Pune Weather Update
निसर्ग चक्रीवादळाचा काहीसा परिणाम हा पुणे जिल्ह्यावर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून डोंगरदऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात. जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. वादळी वाऱ्यांमुळे झाडे, विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
हवामान तज्ञ
जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून डोंगरदऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात. जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. वादळी वाऱयांमुळे झाडे, विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आज रात्री साडे आठपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यावर चक्रीवादळाचा परिणाम राहील. त्यानंतर रात्री हळूहळू शहरातील वातावरण पूर्वपदावर येईल. उद्या दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.