पुणे - मी आणि माझे संपूर्ण कुटुंब खूप आनंदात आहोत. खूप गर्व वाटतो. सगळ्या जगासाठीच ही फार मोठी घटना आहे, आणि त्यामध्ये आमचा काही प्रमाणात वाटा आहे. हे खूप रोमांचित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया कुल एक्स कंपनीचे संचालक कुणाल अग्रवाल यांनी दिली. कुल एक्स ही औषध वाहतूक क्षेत्रातील अग्रगणी कंपनी आहे. या कंपनीमार्फत कोरोना लसीची वाहतूक होत आहे.
हेही वाचा -जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानतर्फे हेल्पलाईन - डॉ. कल्याण गंगवाल
कुल एक्स कंपनीला कोरोनावरील सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीच्या वाहतुकीची जबाबदारी कशी मिळाली, कशा पद्धतीने या लसीची वाहतूक होते, काय खबरदारी घ्यावी लागते, लस वाहतुकीचा खर्च कोण करतो, याबाबतचा करार कसा झाला यासह विविध विषयांवर कुणाल अग्रवाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली.