बारामती- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीत लिपिकाने अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अब्दुल शेखलाल शेख या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब मोटे यांनी याबाबत फिर्याद दिली.
पवारांच्या काटेवाडीत लिपिकानेच केला अपहार.. गुन्हा दाखल - baramati news
शेख याने ग्रामपंचायतीच्या कर वसुली पावतीची खोटी व बोगस पुस्तक छापून त्यातील ६ पावत्या लोकांना देत या पावत्यांंपोटी ८ हजार ७३४ रुपयांचा तर पावत्या न देता सुमारे २५ हजार रुपये असा ३३ हजार ७३४ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पवारांच्या काटेवाडीत लिपिकानेच केला अपहार
बोगस पुस्तके छापून केला अपहार....
२४ एप्रिल २०१९ ते २८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत लिपिकाने हा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शेख याने ग्रामपंचायतीच्या कर वसुली पावतीची बोगस पुस्तके छापून त्यातील ६ पावत्या लोकांना देत होता. तसेच या पावत्यांंपोटी ८ हजार ७३४ रुपयांचा तर पावत्या न देता सुमारे २५ हजार रुपये असा ३३ हजार ७३४ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.