दौंड (पुणे) -दौंड तालुक्यातील यवत येथील कासुर्डी गावाच्या हद्दीतील विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला आहे. परंतु या मृत व्यक्तीची ओळख पोलिसांना अद्याप पटली नाही. या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
विहिरीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह - Pune District Latest News
दौंड तालुक्यातील यवत येथील कासुर्डी गावाच्या हद्दीतील विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला आहे. परंतु या मृत व्यक्तीची ओळख पोलिसांना अद्याप पटली नाही. या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
![विहिरीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह Pune District Crime News](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9744389-974-9744389-1606947719066.jpg)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कासूर्डी गावच्या हद्दीत, गणेश आखाडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये अंदाजे 25 ते 30 वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला आहे. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्याच रंगांची पॅन्ट आहे. या तरुणाच्या खीशामध्ये पोलिसांना एक फोटो देखील सापडला आहे. मात्र अद्याप या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटवता आलेली नाही. या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.