सातारा - पुण्यातील बिबवेवाडीत राहणारे नीलेश वरघडे हे पुण्यासह सोलापूर, पुणे ग्रामीणमध्ये वास्तूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारा दीपक जयकुमार नरळे (वय २९, रा. नऱ्हे, पुणे) हा चालक होता. दि. १६ ऑक्टोबर रोजी नीलेश वरघडे हे घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असून, अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती.
मित्रानेच केला मित्राचा घात! दागिन्यांसाठी केला खून; १७ दिवसांनी नीरा नदीत सापडला मृतदेह - The body of an architect from Pune
पुण्यातील वास्तूतज्ज्ञ नीलेश दत्तात्रय वरघडे यांची २५ तोळ्यांच्या दागिन्यांसाठी मित्राने हत्या करून त्यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात टाकल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल १७ दिवसांनी हा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे.
![मित्रानेच केला मित्राचा घात! दागिन्यांसाठी केला खून; १७ दिवसांनी नीरा नदीत सापडला मृतदेह murder](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16839073-thumbnail-3x2-ngfjv.jpg)
मित्राने दिली हत्येची कबुली - फिर्यादीच्या अनुषंगाने तपास करीत असताना नीलेश वरघडे यांच्याबरोबर दीपक होता, अशी माहिती मोबाईल लोकेशच्या आधारे पोलिसांना मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी दीपकच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली. त्याने आपला मित्र रणजित ज्ञानदेव जगदाळे ( रा. पनवेल) याच्या मदतीने नीलेश यांना कॉफीमधून झोपेच्या मोठ्या प्रमाणात मात्रा देत दोरीच्या साहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केल्याची कबुली दिली होती.
१७ दिवसांनी सापडला मृतदेह -संशयितांनी नीलेश वरघडे यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावरील २५ तोळ्याचे दागिने कादून घेऊन त्यांचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रामध्ये टाकला होता. संशयितांनी दिलेल्या कबुलीनंतर महाबळेश्वर, प्रतापगड रेस्क्यू टीम आणि शिरवळ रेस्क्यू टीम मृतदेहाचा शोध घेत होती. अखेर १७ दिवसानंतर नीलेश वरघडे यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमना यश आले. पोत्यात बांधलेला आणि सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे.