कष्टातून उभारलेली केळीची बाग डोळ्यासमोर होतेय खराब
कोरोना इफेक्ट: कष्टातून उभारलेली केळीची बाग डोळ्यासमोर होतेय खराब - पुणे लॉकडाऊन
बाजारसमित्यांसह रस्त्यावरील वाहतूकही बंद आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीमाल आणि फळबागांना बसला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक फळ उत्पादत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेल्या केळीच्या बागांमध्ये केळी खराब होत आहे.
![कोरोना इफेक्ट: कष्टातून उभारलेली केळीची बाग डोळ्यासमोर होतेय खराब banana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6853142-667-6853142-1587281906763.jpg)
केळी उत्पादन
पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारसमित्यांसह रस्त्यावरील वाहतूकही बंद आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीमाल आणि फळबागांना बसला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक फळ उत्पादत शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेल्या केळीच्या बागांमध्ये केळी खराब होत आहे.जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथील शेतकरी बाळासाहेब डुंबरे यांनी आपल्या शेतात पाच हजार केळींची लागवड केली. सध्या केळी काढणीला आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने केळीची मागणी घटली आहे परिणामी ही केळी आता झाडावरच खराब होत आहे. त्यामुळे डुंबरे यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. डुंबरे यांच्या प्रमाणेच आणखी कितीतरी शेतकऱ्यांचे असेच नुकसान होत आहे.शेतकऱ्यांच्या डोक्यावर शेतीचे कर्ज, फळबागांच्या मोठ्या भांडवलाचा बोजा असल्याने शेतकरी लॉकडाऊनच्या काळातही शेतात काबाडकष्ट करत आहे. मात्र, त्यांचे हे कष्ट मातीमोल होताना दिसत आहेत. सरकारने पुढील काळात कष्टकरी बळीराजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाण्याची गरज निर्माण झाली आहे.