पुणे - शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे येथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र आहे. शहरात आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात पीएम केअर फंडातून पुणे शहराला मिळालेले तब्बल 58 व्हेंटिलेटर खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या ससून रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर आहेत.
शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यांच्या झालेल्या बैठकीत ससून रुग्णालयाच्या डीनने ही बाब निदर्शनास आणून दिली.