महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टेम्पोलूट प्रकरणातील तक्रारदारच निघाले आरोपी; जुन्नर पोलिसांनी आवळल्या लुटारुंच्या मुसक्या - टेम्पोलूट प्रकरणातील तक्रारदारच निघाले आरोपी

शिरोलीजवळ चोरट्यांनी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीतील दीड लाखांची रोख रात्री लुटल्याची तक्रार गाडी चालक फरहान पठाणने दाखल केली होती. मात्र, गाडीच्या चालकानेच सहकाऱ्यांशी मिळून दरोड्याचा बनाव रचल्याची तक्रार केल्याचे तपासात उघड झाले.

pune
पोलिसांनी पकडलेले आरोपी

By

Published : Jul 11, 2020, 7:02 PM IST

पुणे- कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीतील दीड लाखांचा ऐवज शिरोळीजवळ चोरट्यांनी रात्री लुटल्याची तक्रार गाडी चालक फरहान पठाणने दाखल केली होती. मात्र, गाडीच्या चालकानेच सहकाऱ्यांशी मिळून दरोड्याचा बनाव रचल्याची तक्रार केल्याचे तपासात उघड झाले. जुन्नर पोलिसांनी चालक फरहान पठाणसह त्याच्या सहकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

धक्कादायक; टेम्पोलूट प्रकरणातील तक्रारदारच निघाले आरोपी; जुन्नर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या घटनेची तक्रार वाहनचालक फरहान पठाणने नोंदवली होती. मात्र, तोच आरोपी असल्याचे नंतर उघड झाले. त्याच्यासोबत मोहम्मद कैफ वसीम शेख (वय-२१, चंदीपुरा, जुन्नर) आणि पुण्याचा अझहर जावेद शेख (वय-२१), असिफ कासम शेख (वय- २२) बिलाल मुजाहिद शेख (वय-१९) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अजमेर जावेद शेख व आतिक या दोघांचा शोध सुरू आहे.

गाडीवरील चालक फरहान पठाण (वय २७, शुक्रवार पेठ, जुन्नर) याने त्याच्या सहा मित्रांसोबत हा लुटीचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले आहे. या गाडीतील इतर दोघांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे, हवालदार नामदेव बांबळे, सागर हिले व सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा जलदगतीने छडा लावला.

या घटनेतील पाच गुन्हेगार शिवाजीनगर (पुणे) येथील पाटील इस्टेटमधील होते. हा भाग कंटेंमेंट झोन असून या ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आहेत. तेथे जाऊन गुन्हेगारांना अटक करण्याची कामगिरी जीव धोक्यात घालून ग्रामीण गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने पार पाडली. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि ४१ हजारांची रक्कम जुन्नर पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील सहभागी पाच आरोपींना जुन्नर न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details