पुणे: स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी परिस्थिती अजित पवारांची सवय असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केली आहे. कसबा पोट निवडणुकीसाठी आज बाळासाहेबांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नरेश मस्के यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले म्हस्के: नरेश म्हस्के म्हणाले की, अजित पवारांनी सकाळचा शपथविधी घेतला ते बंड होते, गद्दारी होती की शरद पवारांच्या विरोधात उठाव होता, ते आधी अजितदादांनी स्पष्ट करावे. अजित पवार सकाळी तोंड न धुता शपथविधीला गेले होते आणि शरद पवारांचा मानसपुत्र म्हणणाऱ्या ठाण्यातील नेत्यांनी अजित पवारांचे पुतळे जाण्याचे आदेश दिले होते. म्हणून स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी परिस्थिती अजित पवारांची सवय आहे, अशी टीका केली आहे.
संजय राऊतांवर टीका : संजय राऊत जेलमधून आल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते सकाळी सकाळी भोंग्याप्रमाणे सुरु होतात. जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री कुणी मानत नाही मग यांना मानतात का? असा प्रश्न म्हस्के यांनी केला. तसेच ज्यांच्या मतावर निवडून आलात त्यांना गद्दार म्हणत असाल तर अगोदर राऊत आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा, मग गद्दार म्हणावे. शिवसेना आम्ही संपवली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय राऊताच्या मदतीने शिवसेना संपवली आहे, असेही ते म्हणाले.