पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे ( TET Scam Tukaram Supe ) यांच्यामुळे राज्यातील शिक्षकांचे पगार रखडले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) केलेल्या गैरव्यवहारामुळे तुपे यांच्या कार्यालयाला सील लावण्यात आले ( TET Scam Tupe Office Seal ) आहे. त्यामुळे पुणे विभागातील 188 शिक्षकांचे पगार ( Pune division Teacher Pending Salary ) रखडले आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून रखडला पगार
पुणे विभागातील सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या तील जिल्ह्यातील उच्च माध्यमिक 20 टक्के शाळेवरील शिक्षकांचे 1156 प्रस्ताव हे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातील 188 शिक्षकांची कार्यवाही झाली नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हा पगार रखडला आहे.