पुणे - टीईटी घोटाळ्यात ( TET Scam ) अटक करण्यात आलेल्या आयएएस अधिकारी आरोपी सुशील खोडवेकर ( TET Scam Accused Tested Corona Positive ) याला कोरोनाची लागण झाली असून आज त्याची न्यायालयात व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्याची कोठडी कायम ठेवण्याची मागणी केली. तर सुशील खोडवेकरचे वकील अमोल डांगे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
31 जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश-
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर याला ठाण्यातून शनिवारी अटक केली होती. खोडवेकर याला दअटक केल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला 31 जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आज त्याची पोलीस कोठडी संपणार असल्यामुळे त्याला न्यायालयात हजार करण्यात येणार होते; परंतु कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याची व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी झाली.
सुशील खोडवेकर हा १३वा आरोपी -
परीक्षा आयोजनातील अक्षम्य चुकांमुळे शिक्षण विभागाने बंगळुरूच्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीस काळ्या यादीत टाकले होते. तेव्हा तिला काळ्या यादीतून बाहेर काढण्याची सूचना खोडवेकरने राज्य शिक्षण परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपेला केली होती. हे काम तसेच त्यानंतर वेळोवेळी सुपे, सावरीकर, देशमुख आणि एजंट मनोज डोंगरे यांच्या तो संपर्कात होता. टीईटी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेला खोडवेकर हा १३वा आरोपी आहे.