महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Metro: मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी! भुयारी मार्गातून सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत मेट्रो धावली - Metro runs from the subway to Civil Court

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या 17.4 किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम 4 जून रोजी टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हर हेड विद्यूत तारा, आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात आली. आज मंगळवार (दि. ६ डिसेंबर)रोजी रेजहील डेपो ते रेजहील उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी १३ किमीची मेट्रो चाचणी घेण्यात आली आहे.

मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी!
मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी!

By

Published : Dec 6, 2022, 10:44 PM IST

पुणे - पुणे मेट्रोच्या महत्वाच्या टप्यांपैकी हा तांत्रिक दृष्ट्या अत्यंत्य महत्वाचा असा टप्पा आहे. पुणे मेट्रोचे ८५% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत्य वेगाने सुरु आहेत. त्यामुळे दररोज एक-एक माईलस्टोन पार पडत आहेत. भूमिगत मार्गाचे काम तांत्रिक दृष्ट्या अत्यंत्य आव्हानात्मक असते. बोगदा बनविताना मोठ्या प्रमाणावर निघणारे दगड गोटे यांना जमीच्या खालून साधारणत: ७० ते ८० फुटांवरून वर आणून त्यांची योग्यरीत्या व योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी लागते. तसेच, भुयारी स्थानकासाठी कट अँड कव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे खोदून खालून बांधकाम करत वर यावे लागते.

मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी!

भूमिगत मार्गाचे काम पूर्णत्वाकडे - शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हि अत्यंत्य गजबजलेली ठिकाणे असून या भागांतून सामानाची ने-आण करणे अत्यंत्य जिकरीचे आहे. या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या सामानासाठी वाहतुकीची वाहने रात्री १२ ते सकाळी ५ या वेळातच ने आण करत होती. अश्या आव्हानात्मक परिस्थितीत काम करत मेट्रोने रेंजहीत ते सिव्हिल कोर्ट यातील भूमिगत मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे आणि यामुळेच भूमिगत मेट्रो चाचणी करणे शक्य झाले आहे.

मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी!

30 मिनिटे वेळ लागला - आजची चाचणी दुपारी 3:20 वाजता रेजहील डेपो येथून सुरु झाली. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक अश्या रॅम्प वर वाटचाल करत ट्रेन स्थानकापर्यंत पोहचली. तेथे ड्रायव्हर ने आपला कक्ष बदलला व मेट्रो ट्रेन रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रोचे ट्रक, विदयुत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग सतत कार्यरत होते. या चाचणीला -30 मिनिटे वेळ लागला व चाचणी नियोजित उद्दिष्टनुसार पार पडली.

मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी!

मेट्रोचे कर्मचाऱ्यांचे अहोरात्र प्रयत्न - या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे कि, "आजची भूमिगत मेट्रो चाचणी हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंव्य आव्हानात्मक आणि किचकट अशी होती. या चाचणीसाठी पुणे मेट्रोचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत होते. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचे ८५% काम पूर्ण झाले असून एक एक टप्पा पार पाडत ती पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. येत्या काही महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते सिव्हिल कोर्ट या मार्गांची कामे पूर करून तो प्रवाश्यांसाठी खुला करण्यात येईल.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details