महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident of ST bus And Two Wheeler : एसटी बस आणि दुचाकीचा कात्रज घाटात भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू - कात्रज घाटात अपघात

एसटी बस आणि दुचाकीला कात्रज घाटात अपघात (accident of ST bus and two wheeler in Katraj Ghat) झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार (Death of a young man) झाला. तसेच दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. Latest news from Pune, Pune Crime

Accident of ST bus And Two Wheeler
एसटी बस आणि दुचाकीचा अपघात

By

Published : Nov 4, 2022, 10:18 PM IST

पुणे: एसटी बस आणि दुचाकीला कात्रज घाटात अपघात (accident of ST bus and two wheeler in Katraj Ghat) झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार (Death of a young man) झाला. तसेच दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातामुळे घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. Latest news from Pune, Pune Crime, Accident of ST bus And Two Wheeler

एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी-अमोल टकले (वय १८, रा. भवानी पेठ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पवन जाधव, त्याच्यासोबत दुचाकीवर असणारा तरुण गंभीर जखमी झाला आहे. नाशिक-सांगली ही राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून कात्रज घाटातून सातारच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे.

तीव्र उतारावर घडला अपघात-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-सांगली ही राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून कात्रज घाटातून सातारच्या दिशेने जात होती. दुचाकीवरील दोघे खेड शिवापूरहून घाटातून पुण्याकडे येत होते. घाटात तीव्र उतारावर ‌बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तरुण जागीच ठार झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details