पिंपरी-चिंचवड - शहरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास टोळक्याने तलवारी आणि कोयते नाचवत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. या टोळक्यात 100 जणाचा सहभाग असल्याचा आंदाज आहे. या टोळक्याने शहरातील नेहरू नगर परिसरात दहा वाहनांची तोडफोडदेखील केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये टोळक्याकडून धुडगूस, दहा वाहनांची तोडफोड - vehicles were vandalized by a mob, In Pimpri Chinchwad
शहरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास टोळक्याने तलवारी आणि कोयते नाचवत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. या टोळक्यात 100 जणाचा सहभाग असल्याचा अंदाज आहे. या टोळक्याने शहरातील नेहरू नगर परिसरात दहा वाहनांची तोडफोडदेखील केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धडपकड सुरू केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी जितेश मंजुळे, आशिष जगधने, इरफान शेख, जावेद औटी, आकाश हजारे यांच्यासह इतर 95 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निलेश पवार यांनी तक्रार दाखल केली होती.
दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये दोन गटात वाद झाला होता. या वादातून 100 जणांच्या टोळक्याने एकत्र येत, तलवारी आणि कोयत्याने वाहनांची तोडफोड केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावेळी आरोपींकडून दुसऱ्या गटातील एका तरुणाला मारहाणदेखील करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.