महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आनंदोत्सव, भाजप करणार 10 लाख लाडूंचे वाटप

अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भाजप हा सोहळा उत्सव म्हणून साजरा करण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भाजप 10 लाख लाडू वाटप करणार
भाजप 10 लाख लाडू वाटप करणार

By

Published : Aug 4, 2020, 7:22 PM IST

पुणे - रामजन्मभूमी अयोध्या येथे उद्या (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या पुढाकाराने तब्बल १० लाख मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, भक्तीमय वातावरणात राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भाजप हा सोहळा उत्सव म्हणून साजरा करण्याच्या तयारीत आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येईल. इंद्रायणीनगर येथील मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात येत आहेत.

याबाबत बोलताना भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे म्हणाले, अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील १० लाख घरात बुंदीचे लाडू वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आपण सर्वांनी आपापल्या घरातून हा सोहळा साजरा करावा व त्याद्वारे आपला परिसर, राज्य व राष्ट्र राममय करावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details