बारामती (पुणे) - गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे बारामतीत दहा रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण बारामतीतील शासकीय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी एकजण सारीचा संशयित रुग्ण होता.
बारामतीतील रुई कोविड सेंटर, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयासह तीन खासगी 'मल्टीस्पेशालिटी' रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा जणांची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर व माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अपवाद वगळता इतर सर्व रुग्ण बारामती तालुक्यातील आहेत. यातील एकाचा मृत्यू कोरोनाने नसून सारीमुळे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन रुग्ण आमराई परिसरातील, एक श्रीरामनगर भागातील, एक चोपडज गावातील, शहरातील गोकुळवाडी व भिगवण रस्त्यावरील तीन रुग्णांचा यामध्ये समावेश होता. त्यांच्यावर जळोची येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामतीत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाचा १ जुलैला मृत्यू झाला. तेव्हापासून आतापर्यंत ३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज झालेले १० मृत्यू सर्वाधिक आहेत.
बारामतीकरांची चिंता वाढली, मागील चोवीस तासात दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
बारामतीतील रुई कोविड सेंटर, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयासह तीन खासगी 'मल्टीस्पेशालिटी' रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा जणांची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला.
बारामती