महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 6, 2020, 11:24 PM IST

ETV Bharat / state

स्थलांतरित कामगारांसाठी पुणे जिल्ह्यात 161 निवारागृहे; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासनामार्फत 3413 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 909 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे.

स्थलांतरित कामगारांसाठी जिल्ह्यात 161 निवारागृहे; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
स्थलांतरित कामगारांसाठी जिल्ह्यात 161 निवारागृहे; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पुणे -विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 51 निवारागृहे तर साखर कारखान्यांमार्फत 110 अशी 161 निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. त्‍यामध्‍ये एकूण 37 हजार 629 कामगार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासनामार्फत 3 हजार 413 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 909 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बेघरांकरिता पुणे शहर तहसील कार्यालय व पुणे महानगरपालिका हद्दीतील 20 शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व व्यक्ती पुणे शहरामध्ये बिगारी काम करणाऱ्या आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करुन एका खोलीत सात किंवा आठ जणांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत दोन वेळा चहा, नाष्‍टा तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्वांची दररोज आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. सर्वांना मास्क, सॅनिटायझर, साबण, तेल तसेच टॉवेलचा पुरवठा करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details