महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर टेम्पोची ट्रकला धडक; ट्रक चालकाचा मृत्यू - MUMBAI-PUNE EXPRESSWAY ACCIDENT news

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि ट्रकच्या भीषण धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर टेम्पोची ट्रकला धडक; ट्रक चालकाचा मृत्यू
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर टेम्पोची ट्रकला धडक; ट्रक चालकाचा मृत्यू

By

Published : Jun 2, 2021, 3:47 PM IST

Updated : Jun 14, 2021, 5:07 PM IST

पिंपरी-चिंचवड/ मावळ- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि ट्रकच्या भीषण धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उर्से टोल नाक्याच्या जवळ घडली आहे, अशी माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. मच्छिन्द्र दिनकर मिसाळ (वय 28) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर याप्रकरणी टेम्पो चालक सिद्धलिंग शिवाप्पा सूनकत (वय 27) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास टेम्पोचालक सिद्धप्पा हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव टेम्पो घेऊन जात होता. तेव्हा, उर्से टोल नाक्या जवळ नियंत्रण सुटल्याने पुढे भरधाव असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. ट्रक महामार्गाच्या कडेला असलेल्या डिव्हायडर पत्र्याला धडकून पलटी झाला यात ट्रक खाली सापडून मच्छिन्द्र मिसाळ याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंजन यांनी दिली आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी देवरे हे पोहोचले होते.

Last Updated : Jun 14, 2021, 5:07 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details