महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंदनापुरी घाटात टेम्पो पलटी, एकजण जागीच ठार - Chandanapuri Ghat

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टोमॅटो घेवून जाणारा आयशर टेम्पो उलटल्याने एकजण जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग उंबरे (३५, रा. गारडगाव, ता. सिन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

चंदनापुरी घाटात टेंम्पो पलटी, एकजण जागीच ठार
चंदनापुरी घाटात टेंम्पो पलटी, एकजण जागीच ठार

By

Published : May 8, 2021, 7:40 PM IST

संगमनेर - तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टोमॅटो घेवून जाणारा आयशर टेम्पो उलटल्याने एकजण जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग उंबरे (३५, रा. गारडगाव, ता. सिन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Tempo reversed in Chandanapuri ghat, one killed on the spot

आयशर टेम्पो हा टोमॅटो घेवून पुणे येथून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. शनिवारी दुपारी हा टेम्पो पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात पलटी झाला. यामध्ये जागेवरच एकजण ठार झाला. घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस नाईक अरविंद गिरी, संजय मंडलिक, कैलास ठोंबरे, उमेश गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या महार्गावरील एक वाहतूकलाइन बंद करण्यात आली.

हेही वाचा-मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली उपसमितीची महत्वाची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details