पुणे- कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी खडकीतील भाजी मंडईत येणाऱ्या नागरिकांचे मॅपिंग करून तपासणी केली जात आहे. त्यानंतरच भाजी मंडईत प्रवेश दिला जात आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाल्याने सर्वत्र काळजी घेतली जात आहे.
नागरिकांची तपासणी करुनच खडकीतील भाजी मंडईत प्रवेश - कोरोनाचा प्रभाव
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी खडकीतील भाजी मंडईत येणाऱ्या नागरिकांचे मॅपिंग करून तपासणी केली जात आहे. त्यानंतरच भाजी मंडईत प्रवेश दिला जात आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाल्याने सर्वत्र काळजी घेतली जात आहे.
गर्दीच्या ठिकाणी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने तो लगेच पसरतो. खडकी कँन्टोमेंट हा परिसर तसा लष्करी आहे. शहरातील भाजी मार्केटमध्ये शिस्त नसली तरी शिस्तीचे कडक पालन करण्यास कँन्टोमेंट बोर्ड हे नागरिकांना भाग पाडत असते. खडकीतील भाजी मंडईत येणाऱ्या प्रत्येकांचे मँपिंग केले जात असुन त्याची तपासणी करुनत भाजी मंडईत प्रवेश दिला जातो. ताप जास्त असल्यास त्यांना भाजी मार्केटमध्ये प्रवेश दिला जात नाही. मंडईच्या तीन्ही बाजुस प्रवेश बंद केला असुन फक्त बाजारातील मुख्य दरवाजातून नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. खबरदारी म्हणून सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मंडईत नागरिकांना प्रवेश दिला जातो.