पुणे -पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू होऊन आता आठवडा लोटला आहे. ऑनलाइन परीक्षेच्या पहिल्या पेपरपासून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या जात असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत होते. तसेच परीक्षा सुरळीत होत असल्याचे वेळोवेळी विद्यापीठाने सांगितले. मात्र, तरीही ऑनलाइन परीक्षेदरम्यानचा तांत्रिक गोंधळ संपत नसल्याचे चित्र आहे.
पुणे विद्यापीठ परीक्षेचा ऑनलाईन घोळ सुरूच - पुणे विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा
अभियांत्रिकी शाखेच्या पीटीडी या पेपरसाठी पहिल्या चार युनिटचे प्रश्न सोडून मागील दोन युनिटचेच प्रश्न विचारले गेले अशी स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
लॉग-इनचा घोळ मिटतो न मिटतो तोच आता चक्क नियोजित वेळापत्रकात असलेल्या पेपरऐवजी भलताच पेपर दिला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही प्रश्नांच्या डायग्राम गायब होण्याची तांत्रिक चूक अजूनही दुरुस्त होऊ शकलेली नाही. बीबीए अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचा चक्क पेपरच बदलला गेल्याचे बघायला मिळाले, तर मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिमच्या पेपरऐवजी चक्क 'ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पेपर दिला गेला होता. अभियांत्रिकी शाखेच्या पीटीडी या पेपरसाठी पहिल्या चार युनिटचे प्रश्न सोडून मागील दोन युनिटचेच प्रश्न विचारले गेले अशी स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.