महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Teacher Transfer : बदली करुन घेण्यासाठी शिक्षकांनी लढवली अनोखी शक्कल; शिक्षकांकडून बोगस प्रमाणपत्र सादर - Teacher transfer

शिक्षक आपल्या सोईनुसार बदली ( Teacher transfer ) करुण घेण्यासाठी खोटे प्रमाणपत्र ( Teacher gave fake certificate for transfer ) सादर करीत असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. सरकारने बदलीतून सूट मिळण्यासाठी काही निकष दिले आहेत. या निकषात बसण्यासाठी शिक्षकांकडून कोणी बोगस घटस्फोट, ( Bogus divorce certificate from teacher ) कोणी बोगस शस्त्रक्रिया तर, कोणी लांब अंतराचा बोगस दाखला सादर करत आहे.

पुणे जिल्हा परिषद
पुणे जिल्हा परिषद

By

Published : Dec 5, 2022, 7:30 PM IST

पुणे :शाळेत जस मुलांना सुट्टी हवी असते. त्यासाठी त्यामुलांकडून आई वडील, शिक्षकांना जस विविध कारणे दिली जातात. तशीच कारणे सध्या शिक्षक आपल्या बदली बाबत ( Teacher gave fake certificate for transfer ) देत आहे. बदली होताना आपल्या सोईनुसार हव्या त्या शाळेवर नियुक्ती मिळावी यासाठी बदलीपात्र शिक्षक विविध युक्त्यांचा वापर करीत आहेत.

बदलीसाठी शिक्षकांकडून बोगस कारणे - राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्यांसाठी ( Teacher transfer ) निश्‍चित करण्यात आलेल्या चार संवर्गापैकी पहिल्या दोन संवर्गात बदलीतून सूट मिळण्यासाठी काही निकष दिले आहेत. या निकषात बसण्यासाठी शिक्षकांकडून कोणी बोगस घटस्फोट, ( Bogus divorce certificate from teacher ) कोणी बोगस शस्त्रक्रिया तर, कोणी लांब अंतराचा बोगस दाखला सादर करत आहे. याबाबत राज्यभरातून तब्बल 35 हजार शिक्षकांनी बदली बाबत अर्ज केला आहे. विशेष म्हणजे अशा या बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाकडे खुद्द शिक्षकांनीच तक्रारी केल्या आहेत.

तक्रार दाखल देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई - ज्या ज्या शिक्षकांनी अशा प्रकारे बोगस करणे देऊन अर्ज केला आहे. त्या सर्व शिक्षकांच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे. 7 एप्रिल 2021 च्या जीआरनुसार जे निकष देण्यात आले आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या शिक्षकांनी कारण नसताना तक्रार दाखल केली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

बोगस प्रमाणपत्रे सादर -जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून बदल्यांमध्ये संवर्ग एकमध्ये दिव्यांग, पक्षघाताने आजारी, हृद्य शस्त्रक्रिया झालेले, यकृत प्रत्यारोपण, कर्करोगाने ग्रस्त, मेंदूचा आजार किंवा शस्त्रक्रिया झालेले आजी-माजी सैनिकांचे पाल्य, विधवा, अविवाहित शिक्षिका, घटस्फोटित, परित्यक्ता आदी श्रेणीतील शिक्षकांचा तर, संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाच्या मुद्यांचा समावेश आहे. यापैकी कोणताही एका प्रकारात येत असलेल्या शिक्षकांना एकतर त्यांच्या इच्छेनुसार सोईची शाळा मिळते किंवा बदलीतून सूटही मिळत. याचा फायदा घेण्यासाठी काही शिक्षकांनी जाणीवपूर्वक ही बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप काही शिक्षकांकडून करण्यात आला आहे.

जाणिवपूर्वक खोटी कारणे - काही शिक्षकांनी तर जी कारणे दिली आहे. त्यात लांबचा मार्ग दाखवून जाणीवपूर्वक अंतर वाढविल्याचे खोटे दाखले सादर केला आहे.पती-पत्नी एकत्रीकरणासाठी दोघांच्या शाळांमधील अंतर हे ३० किलोमीटरपेक्षा अधिक नसावे, असा नियम आहे. यानुसार तीस किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरणात ३० किलोमीटर अंतराच्या आतील शाळांवर नियुक्ती देणे बंधनकारक आहे. याचा लाभ घेण्यासाठी काही शिक्षकांनी लांबचा मार्ग दाखवून जाणीवपूर्वक अंतर वाढविल्याचे खोटे दाखले सादर केले आहे.

ज्या ज्या शिक्षकांनी बदलीसाठी अशा पद्धतीने बोगस दाखले सादर केले आहे. त्यात बोगस शस्त्रक्रियांचे दाखले देणाऱ्या शिक्षकांनी या शस्त्रक्रिया करण्यासाठी रजा घेतल्या होत्या का. त्याबाबत सेवा पुस्तकात नोंदी आहेत का, शस्त्रक्रियासंदर्भातील दवाखान्यातील ऑनलाइन नोंदी, वैद्यकीय देयके (मेडिकल बिल) याबाबतची पडताळणी होणार आहे. आणि ही तपासणी झाल्यावर दरवर्षी अशा पद्धतीने तपासणी करण्याची गरज राहणार नसल्याच देखील यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितल.

ABOUT THE AUTHOR

...view details