पुणेTeachers Protest :राज्यातील नवभारत साक्षरता अभियान आणि शिक्षकाने मुख्यालय स्थळी राहण्याचा आदेश राज्य सरकार देत आहे. शाळाबाह्य कामं करण्यास आमचा विरोध असून शाळेत असणाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी सरकारने आणि शिक्षकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढला असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी यावेळी दिली. राज्यातील जवळपास 38 शिक्षक संघटना यात सहभागी झाल्यात. तसंच पाच हजार शिक्षक सहभागी झाल्याचा दावा या संघटनांतर्फे करण्यात आला आहे. (Teachers Association) पुण्यातील शनिवार वाड्यापासून सुरू झालेला मोर्चा हा विविध मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना या शिक्षकांच्या मोर्चाचे निवेदन देण्यात येणार आहे. (Teachers Protest in Pune)
'या' आहेत मागण्या :सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आमच्याकडील सर्व अशैक्षणिक कामे बंद करून आम्हाला शिकवू द्यावे. नवभारत साक्षरता अभियान स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावे. मुख्यालयाची अट शिथिल करावी. 'ड' वर्ग मनपा आणि नगर पालिका शिक्षकांना वेतन अनुदान १००% शासनाकडून प्रदान व्हावे. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या बांधवांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कायदेशीर वारसास फॅमिली पेन्शन सुरू करावी. ग्रॅज्युटी उपदान तातडीने मिळावे. शिक्षकांच्या मागणी शिवाय कोणतेही प्रशिक्षण घेण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून १००% शिक्षकांची पदे लवकरात लवकर भरण्यात यावी. भरती पूर्वी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करावी. सर्व केंद्र शाळांना एक डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करावा. विषय शिक्षकांना विना अट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्या.