पुणे - भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी शाळा' म्हणून शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषदेची शाळा आदर्श मॉडेल ठरत आहे. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला आहे. 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा' असे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेल्या या शाळेचे नाव आहे. ही शाळा शिक्षणाचे एक मॉडेल म्हणून वाटचाल करत आहे. या शाळेचे मॉडेल पाहण्यासाठी देशभरातून शिक्षण अधिकारी, शिक्षक आणि पालक भेट देत आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या जसपूर येथील शिक्षण अधिकारी आणि तेथील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी या शाळेला भेट दिली.
शिरूरची झिरो एनर्जी शाळा म्हणजे चमत्कार, छत्तीसगडचे शिक्षकही झाले आवाक - shirurs zero energy school at pune district
देशभरातील सरकारी शाळांची अवस्था अतिशय दयनीय असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा रोल मॉडेल ठरत आहे. ही देशातील पहिली तर जगातली तिसरी 'झिरो एनर्जी शाळा' आहे. या शाळेचे मॉडेल पाहण्यासाठी देशभरातून शिक्षण अधिकारी, शिक्षक आणि पालक या शाळेला भेट देत असतात.
![शिरूरची झिरो एनर्जी शाळा म्हणजे चमत्कार, छत्तीसगडचे शिक्षकही झाले आवाक pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5998297-thumbnail-3x2-puneedt.jpg)
हेही वाचा -जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'
शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूरपासून अडीच किलोमीटर अंतरावर 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी हे छोटसे गाव आहे. जेमतेम चारशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱया या गावची सहा वर्षांपूर्वीची गावातली शाळा म्हणजे दोन गळक्या खोल्या, पडक्या भिंती अशी होती. या शाळेतच गावातली मुले शिक्षण घेत होती. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनाी ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थींच्या ही शाळा नव्याने उभी केली आहे. या शाळेचा झालेला कायापालट पहायला देशभरातून शिक्षक, शिक्षण अधिकारी आणि पालक भेट देत असतात. झाला. आज हीच शाळा देशात आणि जगात एक रोल मॉडेल बनली आहे.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील जसपूर येथील शिक्षण अधिकारी आणि तेथील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी या शाळेला भेट दिली. जिल्हा परिषदेची शाळा अशीही असू शकते यावर या पथकातील शिक्षकांचा विश्वास बसला नाही. या शाळेची एकूण प्रगती आणि याठिकाणची शिकवण्याची पध्दत पाहून आपल्या राज्यातही अशा शाळांचे प्रकल्प व्हावे, असे शाळेला भेट दिलेल्या शिक्षकांनी सांगितले. अनेक राज्य सरकारेही 'झिरो एनर्जी स्कूल' चे मॉडेल आपल्या राज्यात राबवण्याच्या तयारीत आहे.