पुणे -सारथीच्या कार्यालयाबाहेर राज्यातील तारादूतांनी एकत्र येत रखडलेल्या मानधनासाठी आंदोलन केले सुरू केले आहे. आदेशित केल्याप्रमाणेतारादूतांचे २ महिन्याचे १८ हजार रुपयांपर्यंतचे मानधन दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.
कुणबी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेली सारथी संस्था गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. संस्थेच्या स्वायत्ततेचा मुद्दा असो किंवा संस्थेचा सातत्याने गाजत असलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा. अशातच आता सारथी संस्थेच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या तारादूताच्या मानधनांचा विषय ऐरणीवर आला आहे. तारादूतांचे काही महिन्यांचे मानधन रखडले असल्याने त्यांचा रोष वाढला असून सोमवारी पुण्यातील सारथी संस्थेबाहेर अनेक तारादूतांनी उपोषण सुरू केले आहे.