महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरची वाहनाला धडक; चार जणांचा मृत्यू तर 12 जखमी - navle bridge pune accident

थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरने वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना येथील नवले पुलाजवळ घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

tanker that was carrying thinner hit another vehicle four died 12 injured
थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरची वाहनाला धडक

By

Published : Oct 22, 2021, 10:50 PM IST

Updated : Oct 23, 2021, 1:23 AM IST

पुणे -येथील पुणे-मुंबई महामार्गावर नऱ्हे याठिकाणी सेल्फी पॉईंट जवळ थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या टेंपो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तसेच १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

टेंपो ट्रव्हेलारला कट मारण्याच्या प्रयत्न -

प्राथमिक माहितीनुसार, बंगळूरुकडून मुंबईकडे थिनर टँकर निघाला होता. नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ या टँकरने बाजूने जाणाऱ्या टेंपो ट्रव्हेलारला कट मारण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नात टँकरने टेंपो ट्राव्हलरला धडक दिली. त्यामुळे टेंपो ट्राव्हलर रोडच्या साईड पट्टीला धडकली व शेजारील सर्व्हिस रोड पट्टीला अडकली. त्यानंतर टँकरने पुढे पीकअप व कंटेनर या दोन वाहनालादेखील धडक दिली. यामध्ये पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -आई-बापाला ओझे नको म्हणून चिठ्ठी लिहून १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; अमरावतीतील घटना

अपघाताची माहिती मिळाल्यावर तातडीने एसीपी वाहतूक विजय चौधरी, सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, अग्निशमन दलाचे प्रभाकर उब्रटकर, पीएमआरडीए सुजित पाटील, सिंहगड वाहतूक पोलीस शाखेचे उदयसिंह शिंगाडे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस कर्मचारी यांनी रस्त्यावरील वाहने बाजूला काढत वाहतूक सुरुळीत करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Last Updated : Oct 23, 2021, 1:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details