पुणे- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर किवळे एक्झिटजवळ डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला आहे. या घटनेत चालक आणि क्लीनर जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर द्रुतगतीमार्गावर डांबर पसरले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथून सांगलीच्या दिशेन 29 टन डांबर घेऊन टँकर जात होता. तेव्हा, पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहनाने अचानक ओव्हरटेक केले असता टँकरचालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पलटला. या अपघातात चालक आणि क्लीनर हे थोडक्यात बचावले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर डांबराचा टँकर पलटी, दोन जखमी
मुंबई येथून सांगलीच्या दिशेन 29 टन डांबर घेऊन टँकर जात होता. तेव्हा, पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहनाने अचानक ओव्हरटेक केले असता टँकरचालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पलटला.
मुंबई-पुणे महामार्गावर डांबराचा टँकर पलटी.
दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील किवळे एक्झिटजवळ असणाऱ्या तीव्र उतारामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आठ दिवसापूर्वी कंटेनर ट्रकचा येते अपघात झाला होता.