महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमचंही ठरलंय! सत्तेचा माज उतरवण्याची ताकद शिवबंधनात, तानाजी सावंतांचा भाजपला इशारा

आम्हीही गाफील नाही, जर कोणाला सत्तेचा माज असेल तो उतरवण्याची हिम्मत शिवबंधनात आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याचा विचार करू नये, आमचंही ठरलयं असे म्हणत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला इशारा दिला आहे.

तानाजी सावंतांचा भाजपला इशारा

By

Published : Jul 22, 2019, 12:26 PM IST

पुणे - आम्हीही गाफील नाही, जर कोणाला सत्तेचा माज असेल तो उतरवण्याची हिम्मत शिवबंधनात आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याचा विचार करू नये, आमचंही ठरलयं असे म्हणत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला इशारा दिला आहे. एकला चलो रे किंवा युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

भूम, परांडा, वाशी येथील पण पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायीक झालेल्या नागरिकांना आयोजित केलेल्या मेळाव्यात सावंत बोलत होते. २०१४ ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चक्रव्यूहात अडकवले होते, तरीही ६३ आमदार त्यांनी निवडून आणल्याचा उल्लेख सावंत यांनी केला. म्हणूनच सध्या प्रत्येक क्षणाला सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे सावंत म्हणाले.

तानाजी सावंतांचा भाजपला इशारा

शिवसैनिकांच्या माध्यमातून सहकारी पक्षांना आश्वासित करतो की, आम्हीही गाफील नाहीत. आमचही ठरलंय, आम्ही मागे राहणार नाहीत. धमक्या देण्याचा विचार करू नका असा अप्रत्यक्ष इशारा सावंत यांनी भाजपला दिला. त्याची प्रचिती एका खासदाराच्या रूपाने दाखवली आहे. तसेच उस्मानाबादमध्ये ६ आमदार हे शिवसेनेचेच असतील असेही सावंत म्हणाले.

जाणता राजाने पळवलेले हक्काचे पाणी परत आणणार

जाणता राजाने पळवलेले हक्काचे पाणी परत आणणार आहे, याला कोणी चॅलेंज समजा किंवा धमकी परंतु आता माघार घेणार नाही असे म्हणत अप्रत्यक्षरित्या सावंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना इशारा दिला. कारण हे आमच्या हक्काचे पाणी आहे. जवळपास मराठवाड्याला यांनी ५०-६० वर्ष फसवले आहे. मराठवाड्यातील मुला बाळांना देशोधडीला लावले आहे. आता मात्र स्वस्थ बसणार नाही. मी वचनबद्ध आहे. मराठवाड्याला येणाऱ्या ५ वर्षात २१ टीएमसी पाणी मिळणारच आहे, असे आश्वासन देखील सावंत यांनी यावेळी दिले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details