महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आधी लगीन कोंढाण्या'चं म्हणणाऱ्या तानाजी मालुसरेंची समाधी सिंहगडावर सापडली

नरविरांच्या बलिदानानंतर शिवाजी महाराजांनी सिंहगडावर तानाजींची समाधी बांधली होती. ती लुप्त झालेली समाधी आता जगासमोर आली आहे.

By

Published : Feb 16, 2019, 7:30 AM IST

Updated : Feb 16, 2019, 7:56 AM IST

सिंहगड

पुणे - सिंहगड किल्ल्यावर अमूल्य ऐतिहासिक ठेवा हाती लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू सहकारी नरवीर तानाजी मालुसरे यांची बलिदान समाधी पुरातत्त्व विभागाला आढळून आली आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी नरविरांची बलिदान समाधी मिळाली आहे. १६७० मध्ये तानाजी सिंहगडावर धारातीर्थी पडले होते.

तानाजी मालुसरेंची देहसमाधी सिंहगडावर सापडली

नरवीरांच्या बलिदानानंतर शिवाजी महाराजांनी सिंहगडावर तानाजींची समाधी बांधली होती. ती लुप्त झालेली समाधी आता जगासमोर आली आहे. सिंहगड अर्थात कोंढाणा किल्ला पुणे महापालिकेच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना नरविरांची बलिदान समाधी सापडली आहे. नरवीर तानाजी मालुसरे हे सिंहगडावर धारातीर्थी पडले होते. या समाधीस छत्रपतीचा स्पर्श देखील झाला आहे. यामुळे, छत्रपती शिवरायांच्या काळातील एक ऐतिहासिक ठेवा देशाला मिळाला आहे. समाधी दिसल्यानंतर पुरातत्व विभागाने समाधीस्थळाची पाहणी केली. पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार याठिकाणी ब्राँझ पुतळा बसविला जाणार आहे. नरविरांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे स्फूर्तीस्थळ आता जतन करण्याची गरज आहे.

Last Updated : Feb 16, 2019, 7:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details