महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तामिळनाडूमधून वारकरी आषाढी वारीत सहभागी; आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास

तामिळनाडू राज्यातून लहान मुलांसह हे वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सहभागी होत असतात.

तामिळनाडू राज्यातून अनेक वारकरी

By

Published : Jun 23, 2019, 9:11 PM IST

पुणे - देवाच्या आळंदी नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरला असताना तामिळनाडू राज्यातून अनेक वारकरी आषाढी वारीत दाखल झाले आहेत. माऊलींच्या दर्शनानंतर हे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करणार आहेत.

तामिळनाडू राज्यातून आलेले वारकरी
तामिळनाडू राज्यातून लहान मुलांसह हे वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सहभागी होत असतात. विशेष म्हणजे या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गळ्यामध्ये माऊलींची तुळशीची माळ पाहायला मिळत आहे आणि या वारकऱ्यांची माऊलीवरील अतूट भक्तीही यातून दिसून येत आहे.माऊलींच्या भक्तीचा महिमा हा या वारकऱ्यांना आज वारीमध्ये घेऊन आला आणि ही वारी करत असताना त्यांना मिळणारा आनंद काही वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details