महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! आजारी व्यक्तीला गंभीर जखमी करून जिवंत जाळले; तासाभरातच आरोपीला अटक - PI Amarnath waghmorde

आजारी व्यक्तीला आज पहाटे चारच्या सुमारास जिवंत जाळल्याची घडली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी तासाभरातच आरोपी नारायणसिंग विजयसिंग झवेरी (वय- 25) याला अटक केली आहे.

घटनास्थळाची माहिती घेताना पोलीस
घटनास्थळाची माहिती घेताना पोलीस

By

Published : Oct 20, 2020, 1:52 PM IST

Updated : Oct 20, 2020, 2:19 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात घरगुती वादातून आजारी व्यक्तीला घरातच गंभीर जखमी करून जिवंत जाळून खून केल्याची धक्कादायक घटना तळेगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीला तळेगाव पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत अटक केली आहे. विजय भगवान झवेरी ( वय- 55 रा. तळेगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आजारी व्यक्तीला आज पहाटे चारच्या सुमारास जाळल्याची घडली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी तासाभरातच आरोपी नारायणसिंग विजयसिंग झवेरी (वय- 25) याला अटक केली आहे.

आजारी व्यक्तीला गंभीर जखमी करून जिवंत जाळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे चारच्या सुमारास अचानक आरोपी नारायणसिंग हा विजय झवेरी यांच्या घराचा दरवाजा ठोठावत होता. दरवाजा न उघडल्यास दोघांना मारतो, अशी दमदाटी करत होता. अखेर दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने विजय यांच्या पत्नीसोबत धक्काबुक्की केली. त्यामुळे त्या आणि त्यांची मैत्रीण घराबाहेर निघून गेल्या. तेव्हा, आरोपी नारायणसिंग याने घराची आतून कडी लावून आजारी असलेल्या विजय यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. आरोपीने विजय यांना गोधडीसह जिवंत पेटवून दिले. या गंभीर घटनेत विजय यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

आरोपी राहायचा शेजारीच...!
आरोपी नारायणसिंग हा मृत विजय यांच्या घराशेजारी गेल्या एक महिन्यांपासून राहात होता. तो त्यांचा नातेवाईक आहे

आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला होता. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. या प्रकरणी तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे.

Last Updated : Oct 20, 2020, 2:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details