महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Talathi Drown In Lake In Pune : दम लागल्याने तलाठ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, 6 तासांनी मृतदेह हाती - पाण्यात पोहताना दम लागला

भोर तालुक्यातील ( Bhor taluka ) वरवे गावात, लघू पाठबंधारेच्या तलावात तलाठ्याचा मृत्यू झाला आहे. पोहताना त्यांना दम लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. बचाव पथकाच्या प्रयत्नांनी त्यांचा मृतदेह शोधून काढला. 6 तासांच्या शोधमोहिमेनंतर भोरमधल्या भोईराज जल अप्पत्ती पथकाला मृतदेह शोधण्यात यश ( Disaster Squad Found Dead Body ) आले. मित्रांसोबत तलावात पोहायला गेले असताना तलाठी मुकुंद चिरके हे बुडाले होते ( Talathi drown in lake ).

Talathi Mukund Chirke
तलाठी मुकुंद चिरके

By

Published : Jul 26, 2022, 11:40 AM IST

पुणे -सातारा महामार्गालगतच्या भोर तालुक्यातील ( Bhor taluka ) वरवे गावात, लघू पाठबंधारेच्या तलावात पोहण्यासाठी गेले असताना बुडालेल्या तलाठ्याचा मृतदेह अखेर बचाव पथकाच्या हाती लागला आहे. 6 तासांच्या शोधमोहिमेनंतर भोरमधल्या भोईराज जल अप्पत्ती पथकाला मृतदेह शोधण्यात यश ( Disaster Squad Found Dead Body ) आले. मित्रांसोबत तलावात पोहायला गेले असताना तलाठी मुकुंद चिरके हे बुडाले होते ( Talathi drown in lake ).

तलाठी मुकुंद चिरके

पोहताना दम लागून पाण्यात बुडले -मृतदेह पाण्याबाहेर काढताच घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली होती. पस्तीस वर्षीय मुकुंद त्रिंबकराव चिरके सहा महिन्यापूर्वी वेल्हा तलाठी म्हणून येथे कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली भोर येथे झाली होती. सोमवारी सकाळी सात वाजता चिरके हे चार मित्रांसोबत वरवे येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहताना त्यांना दम लागून ते पाण्यात बुडले ( Breath Shortness While Swimming ) . चिरके पोहण्यात सराईत होते. मात्र पोहताना त्यांना दम लागल्याने ते तलावात बुडले. बुडताना मदतीसाठी त्यांनी धावा केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी आणि स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. घटनेची माहिती समजताच तातडीने प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील,मंडलअधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रेकिंग आणि पोहण्याची आवड -मुकुंद चिरके हे मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी आणि पोहण्यासाठी जात होते. सोमवारी ते त्यांच्या तीन मित्रांसोबत पोहत असताना चिरके तलावाच्या मध्यभागी असताना त्यांना दम लागला आणि ते बुडाले. भोरच्या भोईराज जल आपत्ती पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केलं,सहा तासांनी त्यांना मृतदेह शोधण्यात यश आलं.मृतदेह पाण्याबाहेर काढताच घटनास्थळी असणाऱ्या नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मनं हेलावून गेली होती.

हेही वाचा -Shilpa Shetty Obscenity Case :अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा दिलासा, अश्लीलतेच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

ABOUT THE AUTHOR

...view details