पुणे -गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. परंतु, काही पुणेकर मात्र लॉकडाऊनच्या नियमांना बगल देत रस्त्यावर फिरताना दिसत आहे. अशा पुणेकरांवर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. मात्र, ते काही ऐकत नाही. त्यामुळे रेड्यावर बसलेला कोरोनारुपी यम प्रत्येकाच्या घरासमोरून फिरत नागरिकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
पुण्याच्या रस्त्यावर अवतरला कोरोनारुपी यम, रेड्यावरून शहरात भ्रमंती - पुणे कोरोना अपडेट
गेल्या तीन दिवसांत हजारो पुणेकरावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मात्र, पुणेकर सर्रास फिरताना दिसत आहेत. यापूर्वी बिबवेवाडी पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या नागरिकांना फूल देऊन गांधीगिरी करत त्यांना घरातच बसण्याचे आवाहन केले होते, तर भारती विद्यापीठ पोलिसांनी अशा नागरिकांना औषधांचे वाटप करत गांधीगिरीद्वारे संचारबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले होते.
गेल्या तीन दिवसांत हजारो पुणेकरावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मात्र, पुणेकर सर्रास फिरताना दिसत आहेत. यापूर्वी बिबवेवाडी पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या नागरिकांना फूल देऊन गांधीगिरी करत त्यांना घरातच बसण्याचे आवाहन केले होते, तर भारती विद्यापीठ पोलिसांनी अशा नागरिकांना औषधांचे वाटप करत गांधीगिरीद्वारे संचारबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले होते. परंतु, या सर्व उपायानंतरही अनेकजण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. अशा नागरिकांना स्वारगेट पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने आवाहन केले आहे. रेड्यावर बसलेला कोरोनारुपी यम स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक घरासमोरून फिरताना दिसत आहे. तुम्हाला घरात बसणे शक्य नसेल; तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय, असे सांगत हा यम नागरिकांनी घरातच राहावे यासाठी आवाहन करतोय.
बहुतांश नागरिक हे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहे. पण काही नागरिक नियम भंग करताना दिसून येतात. त्यांनीही नियमांचे पालन करावे यासाठी आम्हाला हा उपक्रम राबवावा लागला. नागरिकांनी कोरोनारुपी यमाला तरी घाबरावे आणि काही दिवस त्यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी म्हणाले.